डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि डॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार सन २०२२-२3 साठी अर्ज सादर करावेत

 

रायगड,दि.19(जिमाका):-डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कारआणि डॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्रपुरस्कार” सन 2022-23 च्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालयेकार्यकर्ते व सेवक यांनी विहीत नमुन्यातील अर्ज दि.22 जानेवारी ते दि.09 फेब्रुवारी2024 पर्यंत तीन प्रतीत जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेतअसे आवाहन प्र.ग्रंथालय संचालक,ग्रंथालय संचालनालयमहाराष्ट्र राज्यमुंबई श्रीअशोक मा.गाडेकर यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावाग्रंथालयांकडून जनतेला अधिक चांगल्या ग्रंथालय सेवा उपलब्ध करून द्याव्यातवाचन संस्कृती वृध्दीगंत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने डॉबाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार” तसेचग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉशियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने डॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्रपुरस्कार”  देण्यात येतो.

        राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील     वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे रूपये 1,00,000/-, रूपये 75,000/-, रूपये 50,000/- रूपये 25,000/- रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते.

        राज्यातील एक राज्यस्तरीय उत्कृष्ट कार्यकर्ता व एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी रूपये 50,000/- रोख रक्कम आणि प्रमाणपत्र तसेच राज्यातील प्रत्येक महसूली विभागातील प्रत्येकी एक उत्कृष्ट कार्यकर्ता व एक उत्कृष्ट सेवक यांना प्रत्येकी रूपये 25,000/- रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते.

        तसेच अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा दि.16/11/2023 चा शासन निर्णय पहावा.

००००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज