वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन दि.06 मार्च रोजी

  

अलिबाग,दि.04 (जिमाका):- रायगड-अलिबाग वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ रविवार, दि.06 मार्च 2022 रोजी न्याय सेवा सदन, जिल्हा व सत्र न्यायालय, रायगड-अलिबाग येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मुख्य न्यायमूर्ती, उच्च न्यायालय, मुंबई तथा प्रमुख आश्रयदाते, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई श्री.दिपांकर दत्ता हे लाभणार आहेत तर न्यायमूर्ती, उच्च न्यायालय, मुंबई तथा कार्यकारी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई श्री.ए.ए. सय्यद यांच्या शुभहस्ते हा उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे.

न्यायमूर्ती, उच्च न्यायालय, मुंबई तथा पालक न्यायमूर्ती, रायगड-अलिबाग श्री.गिरीश कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ पार पडणार असून अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग असणार आहेत.

तरी या कार्यक्रमासाठी नागरिकांनी, प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संदीप स्वामी तसेच अध्यक्ष, वकील संघटना, अलिबाग ॲड.प्रवीण ठाकूर यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत