“पिंक रन मॅरेथॉन” विजेत्या ऋतुजाचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले अभिनंदन

 


अलिबाग, दि.03 (जिमाका):- लडकी हॅूं..लड सकती हॅूं..! या मोहिमेवर आधारित मुंबई येथे झालेल्या पिंक मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम आलेल्या ऋतुजा सकपाळ (वय-21) हिचे क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी अभिनंदन केले.

मुंबई येथे रविवार दि.27 फेब्रुवारी रोजी मरीन ड्राईव्ह येथून सुरू झालेल्या पिंक रन या 5 किमी अंतराच्या महिला विशेष मॅरेथॉन स्पर्धेत तालुका पेण येथील धावपटू ऋतुजा सकपाळ हिने अव्वल येत ही स्पर्धा अवघ्या 19.03 मिनिटात पूर्ण केली.

तिच्या या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देताना 'ऋतुजा तू लढून दाखवलंस, एक महिला म्हणून तुझा अभिमान वाटतो' या शब्दांत क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी अभिनंदन केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान