“माझी वसुंधरा” अभियानांतर्गत किहीम समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम संपन्न

 

 
 

अलिबाग,दि.03 (जिमाका):- जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या बहुमोल मार्गदर्शनाखाली व अलिबाग उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे आणि अलिबाग तहसिलदार श्रीम. मीनल दळवी यांच्या पुढाकारातून दि.27 फेब्रुवारी 2022 रोजी माझी वसुंधरा अभियान अंतर्गत अलिबाग तालुक्यातील मौजे किहीम येथील समुद्र किनारा स्वच्छता मोहीम संपन्न झाली.

या मोहिमेत किहीम गावातील प्रतिष्ठीत नागरीक, ग्रामपंचायत कर्मचारी, महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच माणुसकी प्रतिष्ठानचे डॉ.राजाराम हुलवान व सदस्य, अलिबाग रोटरी क्लबचे सदस्य सहभागी झाले होते. विशेष म्हणजे किहीम समुद्र किनाऱ्यावर आलेल्या पर्यटकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून या स्वच्छता मोहिमेत आपले योगदान दिले असून ही मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी किहीमचे मंडळ अधिकारी श्री.पाटील यांच्यासह तलाठी श्री.शिंगाडे, श्री.इग्रुळकर, श्री.हांगे, श्री.घुमरे तसेच कोतवाल, पोलीस पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान