गणेशोत्सव कालावधीत राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर 16 टनापेक्षा जास्त क्षमता असणाऱ्या सर्व वाहनांना पूर्णत: बंदी


 

रायगड(जिमाका)दि.21:- दि.27 ऑगस्ट 2025 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाचे अनुषंगाने गणेशभक्त कल्याण, डोंबिवली, ठाणे, वसई, व मुंबई येथून मोठ्या प्रमाणावर कोकण व गोवा या भागात जाण्याकरिता खाजगी व प्रवासी वाहनांचा वापर करतात. त्यामुळे या कालावधीत दोन्ही (पुणे व कोकणमार्गे) मार्गावर प्रचंड प्रमाणात बाहतुकीची वर्दळ वाढते. याकरिता गणेशोत्सव कालावधीत राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर सर्व वाहने ज्यांची वजनक्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त आहे. (जड-अवजड वाहने, ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर, लॉरी इ. वाहने) अशा वाहनाच्या वाहतुकीस पूर्णतः बंदी सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल निलेश धोटे यांनी लागू केली आहे.

दि.23 ऑगस्ट 2025 रोजी 00.01 वाजेपासून ते दि.28 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 23.00 वाजेपर्यंत, दि. 31 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 08.00 वाजेपासून ते रात्री 23.00 वाजेपर्यत आणि दि. 02 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 08.00 वाजेपासून ते रात्री 23.00 वाजेपर्यंत तसेच दि. 06 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 08.00 नंतर ते दि. 07 सप्टेंबर 2025 रोजी 20.00 वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर सर्व वाहने ज्यांची वजनक्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त आहे. (जड-अवजड वाहने, ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर, लॉरी इ. वाहने)यांची वाहतुक पूर्णतः बंद करण्यात येणार आहे.

 

 

जेएनपीटी बंदर व जयगड बंदर येथून आयात निर्यात मालाची वाहतूक करणारी वाहने दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, मेडीसीन, लिक्वीड मेडीकल ऑक्सीजन, अन्न-धान्य, भाजी-पाला, नाशवंत माल इ. जीवन आवश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना लागू राहणार नाही.  तसेच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 च्या रस्ता रुंदीकरण/रस्ता दुरुस्ती कामकाज इ. साठी लागणारे साहित्य ने-आण करणाऱ्या वाहनांना बंदी लागू राहणार नाही.  मात्र या संदर्भात वाहतूकदारांनी संबंधित वाहतूक विभाग/महामार्ग पोलीस यांच्याकडून प्रवेशपत्र घ्यावे असे त्यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत