पनवेल येथे उद्योग सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन
रायगड(जिमाका)दि.21:- आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे जिल्हा उद्योग केंद्र रायगड व लघु उद्योग भारती, रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील सर्व उद्योजकांसाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत शनिवार, दि.23 ऑगस्ट रोजी पनवेल येथे उद्योग सुसंवाद-2025 या कार्यक्रमाचे सकाळी 11.00 वा आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणा, उद्योजक यांनी उपस्थितीत राहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस.हरळया यांनी केले आहे.
या कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधिक्षकअ आचल दलाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, नेहा भोसले आयुक्त, पनवेल महानगर पालिका, मंगेश चितळे व जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस.हरळया तसेच जिल्ह्यातील सुमारे 300-400 उद्योजक उपस्थितीत राहणार आहेत. शनिवार, दि.23 ऑगस्ट रोजी पनवेल औद्योगिक सहकारी वसाहत मर्या.पनवेल येथे "हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र" वृक्ष लागवड अभियानांतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम सकाळी 10.00 वा. आणि जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक सकाळी 10:30 वा. होणार आहे.
000000
Comments
Post a Comment