शस्त्र बाळगण्यास मनाई



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.18- रायगड जिल्ह्यातील कार्यक्षेत्राच्या हद्दीत (नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र वगळून) पोलादपूर, उरण, श्रीवर्धन , कर्जत, खालापूर, महाड,अलिबाग, सुधागड, मुरुड, म्हसळा, पेण, रोहा, पनवेल,तळा,माणगांव या तालुक्यांमध्ये  महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांनी ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व रिक्त पदे असलेल्या ग्रामपंचायतींसाठी पोट निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.  निवडणूका शांततेत, निर्भय व नि:पक्षपाती वातावरणात पार पडण्यासाठी  सोमवार दि.28 पर्यंत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात  शस्त्र परवाना धारकांना त्यांची शस्त्रे ग्रामपंचायत क्षेत्रात आणण्यास तसेच जवळ बाळगण्यास मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. हा आदेश सेवेवरील पोलीस अधिकारी,कर्मचारी,बँकेचे सुरक्षा अधिकारी,कर्मचारी आणि ज्यांना शासकीय कर्तव्याचा भाग म्हणून शस्त्राचा वापर अनुज्ञेय आहे,अशा व्यक्तींना लागू होणार नाही. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 188 अन्वये कार्यवाही केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे.
०००००


Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज