अलिबाग व महाड येथे सामाजिक न्याय विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतीगृह सुविधा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.14:- सामाजिक न्याय विभागाअंतर्गत अनुसूचित जाती मुलांसाठी मोफत वसतीगृह सुविधा शासकीय वसतीगृह,दिव्या अपार्टमेंट, आरसीएफ गेट समोर वेश्वी, अलिबाग, जि. रायगड येथे उपलब्ध आहे. तर महाड येथे   तालुका पोलीस स्टेशनजवळ, नवेनगर महाड जि. रायगड येथे कार्यरत आहे.  या शासकीय वसतीगृहात इयत्ता आठवीपासून  गरीब,  हुशार,  होतकरु, आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना (अनु.जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग,आर्थिकदृष्ट्या मागास, अनाथ व अपंग ) गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. त्यासाठी संबंधित इच्छुकांनी संपर्क साधावा. असे आवाहन वसतीगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.
वसतीगृहात विद्यार्थ्यांना निवास व भोजन व्यवस्था विनामूल्य आहे.   तसेच अभ्यासाकरीता लागणारी वह्या,पुस्तके,शैक्षणिक व लेखन साहित्य विनामूल्य पुरविले जाते. भत्ता दिला जातो. तसेच दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरिता म्हणून दरमहा रु.सहाशे निर्वाहभत्ता दिला जातो. शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गणवेशाचे दोन संचाकरिता गणवेश, रेनकोट, छत्री भत्ता दिला जातो. या व्यतिरिक्त संगणक, ग्रंथालय सुविधा,क्रीडा साहित्य, मनोरंजन इ. अनेक सुविधा उपलब्ध आहेत.
प्रवेशासाठी अटी
            प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या पालकांचे सर्व मार्गांनी मिळून वार्षिक उत्पन्न अनु. जाती, अनु. जमाती विद्यार्थ्यांकरिता दोन लाख रुपयांच्या आत व विमुक्त जाती,भटक्या जमाती,इतर मागासवर्गीय,विशेष मागास प्रवर्ग, विद्यार्थ्यांकरीता एक लाख रुपयांच्या आत असावे.ऑफलाईन प्रवेश अर्जासोबत आवश्यक असलेली पुढील कागदपत्रांच्या सत्यप्रती जोडणे आवश्यक आहे.विद्यार्थ्यांकरिता अर्जासोबत तहसिलदार यांचे सहीनीशी न 2016-17 मधील उत्पन्नाचा दाखला व जातीचे मुलकी अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र व मागील इयत्ता पास झाल्याचे गुणपत्रक व आधारकार्ड, बँक खाते यांची झेरॉक्स व सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे. सन 2018-19 या शैक्षणिक वर्षाकरीता वसतीगृह प्रवेश अर्ज हे वसतीगृहात उपलब्ध करणेत आलेले आहेत.तरी अधिक माहितीकरिता गृहपाल,एम.जे.नरहरे, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह अलिबाग तसेच एस. एफ.कदम गृहपाल, महाड यांचेशी वरील पत्त्यावर संपर्क साधावा.
0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक