दुर्बल घटकांना शाळांमध्ये राखीव प्रवेश सोडत पूर्णः आजपासून प्रवेश सुरु
अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.15- बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 (1)
(सी) नुसार आर्थिक दुर्बल व सामाजिक वंचित घटकातील बालकांना खाजगी कायम विना
अनुदानित व स्वयंअर्थसहाय्य शाळांमध्ये 25 टक्के राखीव प्रवेश देण्यासंदर्भात आज दुसरी सोडत पार पडली. यात इ. 1 ली साठी 160 शाळांमध्ये 2689 जागा, पूर्व
प्राथमिक 06 शाळांमध्ये 29 जागा, शिशु वर्ग 14 शाळांमध्ये 216 जागेकरीता सोडत घेण्यात
आली. ज्या विद्यार्थ्यांची दुसऱ्या सोडतीत निवड झाली असेल त्या विद्यार्थ्यांच्या
पालकांच्या मोबाईलवर मेसेज प्राप्त होईल. त्या पालकांनी दि.16 ते 24 या कालावधीत
संबंधित शाळेत जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. संबंधित शाळांना सकाळी 10 ते सायं. 5 या
वेळेत कार्यालय सुरु ठेवण्याचे आदेश शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले
आहेत.
संबंधित
पालकांना वरील प्रक्रियेमध्ये काही अडचण उद्भवल्यास तालुका स्तरावर गट
शिक्षणाधिकारी कार्यालयात मदत केंद्र स्थापन केले आहे. सदर केंद्रावर आपल्या
समस्यांचे निराकरण करण्यात येईल. या सोडतीसाठी जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी
(प्राथमिक), उप शिक्षणाधिकारी (प्राथमिक), विस्तार अधिकारी, संगणक प्रोग्रामर व
जिल्हास्तरावरील तांत्रिक कर्मचारी उपस्थित होते.
०००००
Comments
Post a Comment