शोध बचाव पथकांना प्रशिक्षण



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.18-शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती निर्माण  झालेल्या आपत्कालीन स्थितीत बचाव व मदत कार्य हाताळण्यासाठी मान्सून -2018 पूर्वतयारी अंतर्गत जिल्हा व तालुकास्तरीय  शोध व बचाव पथके स्थापन करण्यात आली आहेत. जिल्ह्यात एकूण 486 प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यांतर्गत खालापूर व कर्जत येथे तयार करण्यात आलेल्या पथकांना शुक्रवार दि.19 रोजी  खालापुर येथे सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत प्रशिक्षित केले जाणार आहे. आतापर्यंत पनवेल, उरण, अलिबाग, मुरुड, पेण, रोहा, सुधागड, माणगाव, तळा, महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन याठिकाणी प्रशिक्षणे आटोपली आहेत. या प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षक एम.के.म्हात्रे सहायक उपनियंत्रक नागरी संरक्षण दल, उरण व सहाय्यक उपनियंत्रक नागरी संरक्षण दल भोईर यांनी प्रशिक्षण दिले, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी दिली आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज