जागतिक महिला दिन जिल्हा माहिती कार्यालयाचा अभिनव उपक्रम

वृत्त क्र.132                                                                       दिनांक :- 8 मार्च 2017
जागतिक महिला दिन
जिल्हा माहिती कार्यालयाचा अभिनव उपक्रम


अलिबाग (जिमाका)दि.8:-जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय रायगड अलिबाग यांच्यावतीने अलिबाग तालुक्यातील आगरसुरे ग्राम पंचायत कार्यालय येथे शासकीय उपक्रमांची माहिती देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करुन एक आगळा वेगळा उपक्रम साकारण्यात आला.
          यावेळी आगरसुरे ग्रामपंचायतीच्या सरपंच मनस्वी भोईर, राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेती प्रणिता गोंधळी, माहिती अधिकारी विष्णू काकडे, ग्रामसेवक जयेश पाटील, जिल्हा माहिती कार्यालयाचे हिरामण भोईर, जयंत ठाकूर तसेच अन्य महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
यावेळी माहिती अधिकारी विष्णू काकडे यांनी महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेल्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित होणाऱ्या लोकराज्य मासिकाची माहिती दिली. तसेच महिला बचत गट, जिल्हा उद्योग केंद्र यांच्या मार्फत देण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षणाविषयी व मुद्रा कार्ड योजनेविषयी माहिती दिली. या विविध योजनांचा व  प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन करुन त्यांनी महिला दिनानिमित्त उपस्थित सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या.
 प्रणिता गोंधळी यांनीही उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी  महिला बचतगटांनी त्यांची नावे सरपंच श्रीमती भोईर यांचेकडे द्यावीत,असे सांगितले.
ग्रामपंचायती मार्फत राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेची माहिती देवून सरपंच मनस्वी भोईर यांनी  महिलांनी योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे.असे सांगितले. या प्रसंगी लोकराज्य् मासिकाचे वाटप त्यांचे हस्ते करण्यात आले. श्रीमती भोईर यांनी उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
          कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक शाळा नंदाईपाडा मुख्याध्यापिका दिव्या सारंग यांनी केले .
लोकराज्याची पंचसुत्री
          लोकराज्य् हे शासनाचे मुखपत्र आता मराठी, इंग्रजी,हिंदी,गुजराती व उर्दू या पाच भाषेत प्रकाशित होत असून त्याचा लाभ राज्यातील लाखो युवा वर्गाला,नागरिकांना होत आहे. यापूर्वी केवळ मराठी,इंग्रजी व उर्दू या तीन भाषेत  हे मासिक प्रकाशित होत होते.आता त्यात हिंदी व गुजराती भाषेची भर पडल्याने या पंचभाषेद्वारे माहिती व जनसंपर्काची मोहिम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यास लोकराज्यची पंचसुत्री उपयुक्त ठरत आहे.
                   मराठी लोकराज्यची वार्षिक वर्गणी रु.100/- आहे. संपर्कासाठी पत्ता- जिल्हा माहिती कार्यालय, पाध्येवाडी, नवरे इमारत, बँक ऑफ इंडिया जवळ.दुरध्वनी क्र.02141-222019 येथे संपर्क साधावा. इच्छुकांनी आपले संपूर्ण नाव व  पत्ता, रकमेसह जिल्हा माहिती अधिकारी यांचे नावे पाठवावा.

0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक