माणगांव तालुक्यातील जावळी येथील शाळेत प्रवेशासाठी आवाहन


माणगांव तालुक्यातील जावळी
येथील शाळेत प्रवेशासाठी आवाहन
अलिबाग, दि.06,(जिमाका):- रायगड जिल्ह्यामध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्याकरीता जावळी ता.माणगावं येथे निवासी शाळा इयत्ता 6 वी ते 7 वी पर्यंतचे वर्ग नव्याने सुरु होत आहेत. अनुसूचित जातीच्या व नवबौद्धांच्या मुला-मुलींसाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शासकीय निवासी  शाळा सुरु करण्यास मान्यता देण्यात आली असून जावळी ता.माणगांव येथे निवासी शाळा स्थापन करण्यात आली आहे. शासकीय निवासी शाळेमध्ये प्रवेशाकरीता आरक्षण पुढील प्रमाणे  आहे. अनुसूचित जाती-80%, अनुसूचित जमाती-10%, अपंग प्रवर्ग-3%, विमुक्त जाती, भटक्या जमाती-5%, विशेष मागास प्रवर्ग-2%
अनुसूचित जातीच्या मुला-मुलींच्या शासकीय निवासी शाळांसाठी प्रवेश प्रत्येक शैक्षणिक वर्षामध्ये अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2017 पर्यंत राहील. असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड अलिबाग यांनी कळविले आहे.
00000


Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत