रायगड-अलिबाग,दि.13(जिमाका):-सैनिक कल्याण विभागातील सरळ सेवेतील लिपिक टंकलेखक (गट-क) पदभरतीबाबत सैनिक कल्याण विभागाच्या www.mahasainik.maharashtra.gov.in, या संकेत स्थळावर उमेदवाराकडुन ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि.05 नोव्हेबर 2025 पर्यंत देण्यात आली होती. तथापि जास्तीत जास्त उमेदवारांना अर्ज भरण्याची संधी मिळण्याकरिता अर्ज भरण्याकरिता दि.26 नोहेबर 2025 रोजी संध्याकाळी 23.59 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून जास्तीत जास्त उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड अलिबाग ले. कर्नल राहुल वैजनाथ माने (नि.) यांनी केले आहे.
०००००००
Comments
Post a Comment