पनवेल येथे सरदार@150 युनिटी मार्च आणि विकसित भारत पदयात्रेचे आयोजन नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

 


 

रायगड-अलिबाग,दि.12 (जिमाका):- युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत माय भारत केंद्र रायगड, पनवेल महानगरपालिका, जिल्हा प्रशासन रायगड, राष्ट्रीय सेवा योजना आणि स्थानिक सीकेटी महाविद्यालय पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार@150 युनिटी मार्च आणि विकसित भारत पदयात्रा याउपक्रमाचे आयोजन 14 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेत पनवेल येथे करण्यात आले असून सर्व नागरिकांनी या ऐतिहासिक पदयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन रायगड जिल्हा युवा अधिकारी  अमित पुंडे यांनी केले आहे.

या उपक्रमाचा उद्देश तरुणांमध्ये राष्ट्रीय अभिमान, सामाजिक जबाबदारी आणि एकतेची भावनानिर्माण करणे असा आहे. या पदयात्रेद्वारे तरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण राष्ट्राच्या ऐक्य,अखंडता आणि देशभक्तीच्या भावनांना पुनरुज्जीवित करतील. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकसंधभारताच्या विचारांना स्मरून एकात्म भारताच्या निर्मितीचा संकल्प या माध्यमातून घेतला जाणार आहे. देशव्यापी मोहिमेची पार्श्वभूमी 6 ऑक्टोबर 2025 रोजी भारत सरकारने माय भारत पोर्टलवरून ‘सरदार@150 युनिटी मार्च’या डिजिटल मोहिमेची सुरुवात केली. या उपक्रमात सोशल मीडिया रील स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा आणिसरदार@150 यंग लीडर्स प्रोग्रामचा समावेश आहे. या प्रोग्राममधील 150 विजेत्यांना राष्ट्रीय पदयात्रेतसहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे.मोहिमेचे दोन टप्पे  जिल्हा स्तरावरील पदयात्रा (8 ते 10 कि.मी.):प्रत्येक जिल्ह्यात 6 ते 8 कि.मी. लांबीची पदयात्रा काढली जाईल. शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध,वादविवाद, परिसंवाद, पथनाट्य आदी उपक्रम, नशामुक्त भारत व ‘अभिमानाने स्वदेशी’ अशा प्रतिज्ञाअभियानासह योग, आरोग्य व स्वच्छता मोहिम आयोजित करण्यात येणार आहे. पदयात्रेदरम्यान सरदार पटेल यांच्या प्रतिमेस अभिवादन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रमाणपत्र वितरण केले जाईल.

 राष्ट्रीय पदयात्रा (26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2025) : करमसद (पटेल यांचे जन्मस्थान) ते केवडिया (स्टॅच्यू ऑफ युनिटी) असा 152 कि.मी. प्रवास होईल. मार्गावरील गावांमध्ये सामाजिक विकास उपक्रम, ‘डेव्हलपिंग इंडिया प्रदर्शन’ आणि ‘सरदार गाथा’ सादरकेली जाईल.नोंदणी आणि सहभाग सर्व नोंदणी माझे भारत पोर्टलवर https://mybharat.gov.in/pages/unity_march,  यावर सुरू आहेत. देशभरातील तरुणांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून एक भारत, श्रेष्ठ भारत या संकल्पनेला प्रत्यक्षात आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत