मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत ई-केवायसी करण्याची संधी उपलब्ध
रायगड-अलिबाग,दि.10(जिमाका):- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. तथापि ही प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे किंवा कसे याबाबतचा पर्याय निवडताना नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडण्यात आलेला आहे, अशा लाभार्थी महिलांसाठीच ऑनलाईनमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी दि.31 मार्च 2026 पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आलेली असून दि.06 फेब्रुवारी 2026 रोजी याबाबतचा शासननिर्णय निर्गमित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे यांनी दिली आहे.
या अनुषंगाने योजनेच्या पोर्टलवर सुधारणा करण्यात आली आहे, यापुढे कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाणार नाही.
०००००००
Comments
Post a Comment