सुरक्षित इंटरनेट दिवसानिमित्त पी.एन.पी. कॉलेज, अलिबाग येथे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व्याख्यान कार्यक्रम संपन्न
रायगड-अलिबाग,दि.10(जिमाका):- राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (NIC), जिल्हाधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग यांच्या वतीने सुरक्षित इंटरनेट दिवस निमित्त (09 फेब्रुवारी रोजी) पी.एन.पी. कॉलेज, अलिबाग येथे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व्याख्यान कार्यक्रम संपन्न झाला.
या व्याख्यान कार्यक्रमात दैनंदिन जीवनात इंटरनेटचा सुरक्षित वापर, सायबर फसवणूक, सोशल मीडिया वापरताना घ्यावयाची काळजी, ऑनलाईन व्यवहारातील सुरक्षितता तसेच वैयक्तिक माहितीचे संरक्षण याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी निलेश लांडगे यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सायबर सुरक्षेबाबत सखोल माहिती देत डिजिटल युगात जागरूक राहण्याचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी या व्याख्यानातून सायबर विश्वातील संभाव्य धोके व त्यावरील उपाययोजना समजून घेतल्या.
या कार्यक्रमास पी.एन.पी. कॉलेजचे प्राचार्य श्री. पोटे यांच्यासह राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे अभियंते निखिल पडते, विराज चांगे व योगेश कराड उपस्थित होते.
0000000

Comments
Post a Comment