लघुलेखन परीक्षाशुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत

 

रायगड-अलिबाग, दि.23 (जिमाका):- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या माध्यमातून शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स (GCC-TBC) लघुलेखन परीक्षा व ऑनलाईन दरवर्षी जून व डिसेंबर महिन्यात घेण्यात येतात. माहे जानेवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल दि.10 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.

या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांतील अमृतच्या लक्षित गटातील (ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कागा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगूनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, हिंदू नेपाली, भूमिहार, लोहाणा, कानबी) विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ घेण्यासाठी अमृत संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://mahaamrut.org.in/) ऑनलाईन पद्धतीने अर्ज दि. 30 एप्रिल, 2026 पर्यंत मागविण्यात येत आहेत.

ऑनलाईन अर्जासोबत  गत आर्थिक वर्षाचे (सन 2025-26) अथवा पुढील आर्थिक वर्षासाठी (सन 2026-27) लागू असलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र अथवा EWS प्रमाणपत्र,  राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate), लक्षित गटाची जात नमूद असलेला शासकीय पुरावा (उदा. T.C./L.C./ शालेय निर्गम उतारा इ.), परीक्षा (माहे जानेवारी 2026) उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, बँक खाते तपशीलासाठी बँकेचे पासबुक/रद्द केलेला धनादेश (Cancelled Cheque) याची स्पष्ट प्रत ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

 

00000000

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन