होय,आपण क्षयरोग संपवू शकतो-पनवेल मनपाचा निर्धार ; टी.बी.मुक्त भारत अभियान अंतर्गत 100 दिवसीय मोहिमेची दमदार सुरुवात

 

 

रायगड-अलिबाग दि.25 (जिमाका) :- पनवेल महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत ‘टी.बी. मुक्त भारत अभियान’ अंतर्गत 100 दिवसीय क्षयरोग मोहिमेचा उद्घाटन समारंभ  24 मार्च 2026 रोजी जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे संपन्न झाला.

केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रीय स्तरावर मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचे ऑनलाईन पद्धतीने थेट प्रक्षेपण कार्यक्रम फडके नाट्यगृहात येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, सभागृह नेते प्रकाश बिनेदार, विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे तसेच नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन