जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांकरिता दि.17 मार्च रोजी पनवेल येथे पंडित दीन दयाळ उपाध्याय रोजगार मेळावा
रायगड-अलिबाग,दि.13(जिमाका):- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग व महाराष्ट्र भूषण डॉ. श्री.नानासाहेब धर्माधिकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था,पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 17 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र भूषण डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था,पनवेल.जुना मुंबई-पुणे हायवे,गांधी हॉस्पिटलसमोर, बसस्थानकजवळ, ता.पनवेल येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्र, रायगड-अलिबागच्या सहायक आयुक्त श्रीम.अ.मु.पवार यांनी केले आहे.
जिल्ह्यातील नामांकीत आस्थापनांकडील रिक्तपदांच्या /ॲप्रेंटिसशिपची भरतीसाठी रोजगार मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात एस.एस.सी./एच.एस.सी,आय.टी.आय.,
रोजगार मेळाव्यात सहभागी होणाऱ्या नवउद्योजकांकरिता महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या कर्ज योजनां विषयाची माहिती दिली जाईल, जेणेकरून स्वयंरोजगार करणाऱ्या इच्छूक उमेदवारांना योजनेचा लाभ मिळू शकेल. तसेच रोजगार मेळाव्यातील रिक्तपदांची माहिती https://rojgar.mahaswayam.gov.
संकेतस्थळावर ऑनलाईन अप्लाय करताना काही समस्या असल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02141-222029 व या कार्यालयाचे लिपिक टंकलेखक श्री.म.भा.वखरे,यांच्या 9421613757 या भ्रमध्वनी वर संपर्क साधावा.
000000
Comments
Post a Comment