80 वर्षे व त्यावरील लाभ मिळण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयात अर्ज सादर करावा
रायगड-अलिबाग,दि.10(जिमाका): शासनाच्या 80 वर्षे व त्यावरील निवृत वेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्तीवेतन, कुटूंब निवृत्तीवेतनात वाढ करण्यासाठी जन्मदाखला, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, पारपत्र, बँक खाते असलेल्या बँक शाखा प्रमुखाचे प्रमाणपत्र, शासकीय निमशासकीय आस्थापनांचे प्रमाणपत्र, सेवा पुस्तकातील नोंद, ओळखपत्र, सेवानिवृत्त झालेल्या कार्यालय प्रमुखांचे प्रमाणपत्र, वाहन परवाना,भारतीय जीवन विमा कंपनी अथवा अन्य विमा कंपनी यांच्याकडील पॉलिसी इत्यादी (यापैकी कोणताही एक पुरावा) कोषागार कार्यालयात सादर करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी दीपक बोडके यांनी केले आहे.
80 वर्षे व त्यावरील लाभ मिळण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयात अर्ज सादर करण्यात यावा. तसेच अर्जामध्ये बँकेचे नाव, खाते क्रमांक, पीपीओ क्रमांक नमूद करावा. वयाचा पुरावा सोबत जोडण्यात यावा. ज्या निवृत्तीवेतनधारकांना 80 वर्षाचा लाभ मिळत आहे त्यांनी पुन्हा अर्ज करू नयेत. तसेच अधिक माहितीकरिता रायगड जिल्हा कोषागार कार्यालयाकडे संपर्क साधावा.
0000000
Comments
Post a Comment