राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने वाहनांना हाय सिक्युरीटी नंबर प्लेट बसविणे आवश्यक
रायगड,दि.18(जिमाका) :- वाहनांमुळे होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे नंबर प्लेटमध्ये होणारी छेडछाड व बनावटगिरी रोखण्याकरिता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वाहनांना हाय सिक्युरीटी नंबर प्लेट (HSRP) बसविणे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक असल्याची माहिती सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल यांनी दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी व नागरीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन HSRP ची भूमिका लक्षात घेऊन राज्य शासनाने दि. 01 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादीत केलेल्या वाहनांना HSRP बसविण्याचा निर्णय घेतला असून अशा जुन्या वाहनांना बसविणे बंधनकारक आहे. दि.01 एप्रिल 2019 नंतर खरेदी केलेल्या वाहनांवर उत्पादका मार्फतच हाय सिक्युरीटी नंबर प्लेट (HSRP) बसविण्यात आल्यामुळे अशा वाहनधारकांना पुन्हा नंबर प्लेट लावण्याची आवश्यकता नाही.
ज्या वाहनधारकांची वाहने 01 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादीत झालेली आहेत अशा सर्व संबंधित वाहन मालकांनी बसविण्यासाठी परिवहन विभागाच्या https::transport.maharashtra.
या कामासाठी परिवहन विभागाने 3 कंपन्यांची नेमणूक केली असुन त्यांच्यामार्फतच (HSRP) लावणे बंधनकारक आहे. इतर कोणत्याही अनधिकृत विक्रेत्याकडुन लावलेल्या नंबर प्लेटची नोंद केंद्र सरकारच्या डेटाबेस मध्ये होऊ शकणार नाही. ही नंबर प्लेट बसविण्याकरीता दि.30 मार्च 2025 पर्यंत नोंदणी करावी. याविषयी काही तक्रारी किंवा शंका असल्यास परिवहन विभागाच्या पोर्टलवर अथवा dytccomp.tpt-mh@gov.in या इ-मेल वर संपर्क करावा.
तसेच वाहनधारकांची गैरसोय व कार्यालयातील होणारी गर्दी टाळण्यासाठी वाहनधारकांनी ज्या वाहनधारकांचा मोबाइल नंबर वाहन प्रणालीवर नोंद नसेल अशा वाहनधारकांनी त्यांचे स्वतःचे ई-मेल वरुन या कार्यालयाच्या ई-मेल rto.46-mh@mah.gov.in वर मेल करुन आपले ई-आधारकार्ड व वाहन नोंदणी पुस्तक जोडून मोबाइल नंबर अपडेट करण्यासाठी अर्ज करावा.
000000
Best platform for booking HSRP online!
ReplyDeleteMy hsrp