अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांनी परदेशात शिक्षणासाठी परदेश शिष्यवृत्ती करिता अर्ज करावेत
रायगड,दि.18(जिमाका) :-अल्पसंख्यांक विकास विभागांतर्गत अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांनी परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी मिळण्याच्या परदेश शिष्यवृत्ती निवडीसाठी सन 2024-25 करिता पात्र विद्यार्थ्यांनी परिपूर्ण आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, रायगड सुनील जाधव यांनी केले आहे.
या योजनेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे :- विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी व अल्पसंख्याक समुदयातील घटकतील असावा. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्षे च पीएचडीसाठी 40 वर्षे ही कमाल वयोमर्यादा असेल. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.8.00 लाखापेक्षा जास्त नसावे (विवाहित महिला उमेदवारांनी पतीकडील कुटुंबाचे एकत्रीत वार्षिक उत्पन्नाचा दाखला देणे आवश्यक आहे. जर विवाहित महिला उमेदवार विधवा. घटस्फोटीता असून वडिलांकडे वास्तव्यास असल्यास महिला उमेदवाराने वडीलांकडील कुटुंबाच्या उत्पन्नानुसार अर्ज केल्यास तरी कायदेशीर कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे).पीएचडीसाठी 4 वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा कमी असेल तो तथापि कोणत्याही परिस्थितीत दोन वर्षापेक्षा कमी नसावा. परदेशी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत दोन वर्ष कालावधीचाच MBA अभ्यासक्रम अनुज्ञेय राहील. शिष्यवृत्ती द्यावयाच्या एकूण जागेपैकी 30 टक्के जागांवर मुलींची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. जर त्याप्रमाणात मुलींचे प्रवेश अर्ज प्राप्त न झाल्यास त्या जागेवर मुलांची गुणवत्तेनुसार निवड करण्याचे अधिकार निवड समितीला राहतील.
एकाच कुटूंबातील जास्तीत जास्त दोन मुलांना परदेश शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल त्यापेक्षा जास्त मुलांना परदेश शिष्यवृत्ती लागू राहणार नाही. पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पदवी परिक्षेत व पीएचडी साठी पदव्युत्तर परीक्षेत किमान 55 टक्के गुण असणे आवश्यक आहे. ही पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम त्याने अर्जाच्या दिनांकाला उतीर्ण केलेला असावा.परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत (QS World University Rank) 200 च्या आत असावी.
तसेच अधिक माहितीसाठी शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ताज्या घडामोडीमध्ये विस्तृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदरील वेबसाईट वरुन अटी व शर्ती व अर्ज डाऊनलोड करुन तो परिपूर्ण आवश्यक त्या कागदपत्रांसह दि. 25 फेब्रुवारी 2025 पर्यंत सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत समक्ष किंवा पोस्टाने समाज कल्याण आयुक्तालय, 3 चर्च रोड, पुणे 411001 येथे सादर करावेत.
०००००००
Reasonable rates and speedy replies! Adore it!
ReplyDeleteMy hsrp