“होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स” पदासाठी रोजगाराची सुवर्णसंधी जिल्ह्यातील युवक-युवतींनी अर्ज करावेत
रायगड,(जिमाका)दि.12:- शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत रायगड जिल्ह्यातील युवक-युवतींना इस्त्राईल देशात “होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स” या क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती विभागाने दिली आहे. तसेच पहिल्या टप्प्यात सुमारे 5000 युवक-युवतींना संधी मिळणार आहे. याकरिता जिल्ह्यातील युवक-युवतींनी अधिक माहिती व नोंदणीसाठी https://
यासाठी पात्रता निकष पुढीलप्रमाणे :-“होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स” सेवांसाठी निपुण/पारंगत,भारतातील नियामक प्राधिकरणाव्दारे मान्यताप्राप्त असलेले व किमान 990 तासांचा कोर्स पूर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. (including OJT). भारतीय प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या मिडवायफरीमधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंटमधील प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक. जीडीए/एएनएम/ जीएनएम / बीएससी नर्सिंग / पोस्ट बीएससी नर्सिंगची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणे आवश्यक. वय वर्षे 25 ते 45 वयोगटाचे उमेदवार या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत. रू.1 लाख 61 हजार पर्यंत मासिक वेतनाची संधी. इस्त्राईल येथे नोकरी मिळविण्यासाठी महाराष्ट्रातच निवड प्रक्रिया व नियुक्तीचे वाटप, आरोग्य तपासणी, व्हिजा आणि पासपोर्टसाठी संपूर्ण मार्गदर्शन व मदत. मेडिकल विमा,राहण्याची आणि जेवणाची सोय. इस्त्राईल येथील सुरूवातीच्या काळात आवश्यक मदत.
000000
Comments
Post a Comment