राज्य व जिल्हास्तरीय जागतिक कौशल्य स्पर्धेकरीता 23 वर्षाखालील पात्र उमेदवारांनी नाव नोंदणी करावी
रायगड,(जिमाका)दि.12:- जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी होते आणि ही जगातील सर्वात मोठी व्यवसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून जगभरातील 23 वर्षाखालील तरूणाकरीता त्याच्यातील कौशल्य सादर करण्याची स्पर्धाही ऑलिम्पिक खेळासारखीच आहे. जागतिक कौशल्य स्पर्धा सन 2026 मध्ये शांघाई येथे आयोजित होणार आहे. या स्पर्धेकरिता रायगड जिल्ह्यातील 23 वर्षाखालील पात्र उमेदवारांनी https://www.skillindiadigital.
त्यानुषंगाने 2026 मध्ये आयोजित केलेल्या जागतिक स्तरावरील कौशल्य स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने 63 क्षेत्राशी संबंधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसायशिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर स्किल कौंसिल, विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने कौशल्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य आणि देशपातळीवर करून निवड केलेल्या उमेदवारांची नावे पुढील जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येतील.
शांघाई येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धा 2026 जिल्हा, विभाग, राज्य आणि देशपातळीवरून प्रतिभा संपन्न, कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने आयोजित स्पर्धेकरीता सर्व ITIS, Polytechnics, MSME Tools Rooms, CIPET, IIT, Engineering College, IHM/Hospitality Institutes, Corporate Technical Institute, Skill Training Institute, Colleges, Maharashtra State Skill University, MSBVET, Private Skill University, Fine Arts College, Flower Training Institute, Institute of Jewellery Making, प्रशिक्षण संस्था तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अधिनस्त सर्व व्यवसाय प्रशिक्षण संस्था यांना सदर स्पर्धेत सहभागी होण्याकरीता निवेदन करण्याकरीता अवगत करण्यात येत आहे.
जागतिक कौशल्य स्पर्धा 2026 करीता वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आलेला आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी 50 क्षेत्रांकरिता उमेदवाराचा जन्म दि.01 जानेवारी 2004 किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे. तसेच 13 क्षेत्रांकरिता उमेदवाराचा जन्म दि.01 जानेवारी, 2001 किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे. या क्षेत्रांची माहिती https://www.skillindiadigital.
0000000
Comments
Post a Comment