स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस मुख्यालय मैदानावर महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न होणार ध्वजारोहण
रायगड,दि.13 (जिमाका):- भारताच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ शुक्रवार, दि.15 ऑगस्ट 2025 रोजी महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते अलिबाग पोलीस मुख्यालय मैदान येथे सकाळी 9.05 वा.संपन्न होणार आहे.
मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाचवेळी होणार असल्याने सकाळी 8.35 ते 9.35 वाजता या वेळेत त्या दिवशी इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8.35 वाजण्याच्यापूर्वी किंवा 9.35 वाजल्याच्या नंतर आयोजित करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.
तरी नागरिकांनी, प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी या समारंभासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
००००००
Comments
Post a Comment