आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दि.21 जून रोजी अलिबाग पोलीस परेड ग्राऊंड येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन

 अलिबाग, दि.17 (जिमाका):- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दि.21 जून 2022 रोजी सकाळी 07.30 वाजता, केंद्रीय संचार विभाग, प्रादेशिक कार्यालय, अहमदनगर, महाराष्ट्र आणि गोवा यांच्यातर्फे अलिबाग येथील पोलीस परेड ग्राऊंड येथे एका विशेष प्रचारात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये योग अभ्यासक, मार्गदर्शन, रॅली व महाराष्ट्रातील पारंपरिक खेळ अशा विविध कार्यक्रमांचा समावेश असणार आहे.

सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन्स, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्र यांच्यासह प्रिझम सामाजिक विकास संस्था, श्री अंबिका योग कुटीर, ठाणे यांचे प्रतिनिधीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत