जिल्हा संसाधन व्यक्ती या पदाकरिता अर्ज सादर करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
अलिबाग,दि.14 (जिमाका):- आत्मनिर्भर
भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन (PMFME) या केंद्र पुरस्कृत
योजनेंतर्गत राज्य नोडल एजन्सीच्या वतीने जिल्हास्तरावर लाभार्थ्यांना पाठपुरावा, हाताळणी
सहाय्य देण्यासाठी संसाधन व्यक्तींची नामिकासूची (Panel Resource Persons) तयार करावयाची
आहे. त्यासाठी या योजनेच्या मार्गदर्शक सूचनेतील अटी व शर्तीनुसार बंद लिफाफ्यातून
अर्ज मागविण्यात येत आहेत.
जिल्हा संसाधन व्यक्ती या पदाकरिता अटी व शर्ती पुढील
प्रमाणे:- शिक्षण-पदवीधर (कोणत्याही शाखेचा) वय- कोणतीही अट नाही, अनुभव-सविस्तर
प्रकल्प अहवाल (DRP) बनविणे, अर्ज सादरीकरण, बँक मंजूर पद्धती, प्रक्रिया व अन्नप्रक्रियेतील
अत्याधुनिक तंत्रज्ञान इत्यादींची माहिती असणाऱ्यांना प्राधान्य, स्थानिकांना प्राधान्य.
या पदाकरिता
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 20 जून 2022 आहे. योजनेच्या मार्गदर्शक सूचना, अर्जाचा नमुना, सविस्तर
पात्रता परिश्रमिक (मानधन) व इतर अटी शर्ती या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय
रायगड-अलिबाग येथे तसेच कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या
अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या पदासाठी संस्था पात्र असणार नाहीत, असे जिल्हा
अधीक्षक कृषी अधिकारी रायगड-अलिबाग श्रीमती उज्वला बाणखेले यांनी कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment