माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्या वतीने शाळा प्रवेशोत्सव साजरा
अलिबाग,दि.15 (जिमाका):- माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्या वतीने आज दि.15 जून 2022 रोजी “शाळा प्रवेशोत्सव” साजरा करण्यात आला. इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या सर्व बालकांचे गुलाब पुष्प, खाऊ व सोबत मास्क देवून स्वागत करण्यात आले.त्याचबरोबर इयत्ता 1 ली ते 4 थी वर्गातील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटपही करण्यात आले.
यावेळी शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थीनी, शिक्षक आणि पालक या कार्यक्रमास उपस्थित होते.
येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी, याकरिता पालिका ग्रंथालयात मोफत प्रवेश दिला जाणार असून, बाल साहित्य आणि पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त आवश्यक ग्रंथसंपदा विद्यार्थ्यांसाठी खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षकांना आवश्यक पुस्तकांची यादी पाठविण्याचे आवाहन माथेरान नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी केले आहे.
00000

Comments
Post a Comment