राज्य अन्‍न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

 


 

अलिबाग,दि.15 (जिमाका) :  राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश सूर्यकांत ढवळे हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

      गुरुवार दि.16 जून 2022 रोजी सकाळी 9:30 वा. मुंबई येथून रायगड येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे रवाना.    सकाळी 11.00 ते दुपारी 12:30 वा. पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय येथे अप्पर जिल्हाधिकारी तथा जिल्हा तक्रार निवारण अधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासमवेत Aepds अंतर्गत नियतन, उचल वाटपाचा आढावा. दुपारी 1:30 ते दुपारी 3.00 वा.पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय येथे शिक्षणाधिकारी प्राथमिक व मनपा प्रशासकीय अधिकारी (शापोआ) यांच्यासमवेत शालेय पोषण आहार योजनेंतर्गत नियतन, उचल व वाटपाचा आढावा. दुपारी 3.00 ते सायं.4.30 वा.पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा कार्यक्रम अधिकारी व प्रकल्प अधिकारी शहरी व ग्रामीण यांच्यासमवेत महिला व बाल विकास सेवा योजनेंतर्गत नियतन, उचल वाटपाचा आढावा. सायं. 5.30 वा. शासकीय विश्रामगृहाकडे रवाना व मुक्काम.

     शुक्रवार, दि. 17 जून 2022 रोजी सकाळी 11.00 ते सायं.6.00 वा.पर्यंत शासकीय धान्य गोदामे, शालेय पोषण आहार पुरवठादार गोदामे, महिला व बाल विकास सेवा योजना पुरवठादार गोदामांना भेटी तसेच अंगणवाडी, स्वस्त धान्य दुकानांना भेटी.   सायं.6.30 वा. शासकीय विश्रामगृहाकडे रवाना व मुक्काम.

       शनिवार, दि.18 जून 2022 रोजी सकाळी 11.00 ते सायं.5.00 वा.पर्यंत शासकीय धान्य गोदामे, शालेय पोषण आहार पुरवठादार गोदामे, महिला व बाल विकास सेवा योजना पुरवठादार गोदामांना भेटी तसेच अंगणवाडी, स्वस्त धान्य दुकानांना भेटी.   सायं. 6.30 वा. मुंबईकडे रवाना.

000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज