अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे अर्ज निकाली काढण्यासाठी उद्यापासून विशेष मोहिम



अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.25- अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारतर्फे मॅट्रिकोत्तर  शिष्यवृत्ती / फ्रिशिप देण्यात येते. अशा विद्यार्थ्यांचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी गुरुवार दि.27 पासून 6 ऑक्टोबर पर्यंत विशेष मोहिम राबविण्यात  येत असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त रविकिरण पाटील यांनी दिली असून या कालावधीत जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी आपल्या महाविद्यालयस्तरावर प्रलंबित अर्ज निकाली काढावेत असे आवाहनही केले आहे.
सन 2011-12 पासून राज्यामध्ये महाविद्यालय स्तरावर एकूण 1,42,228 अर्ज प्रलंबित आहेत ते निकाली काढण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.  त्याअनुषंगाने जिल्ह्यातील महाविद्यालयामध्ये ज्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, फ्रिशीपचे अर्ज ऑनलाईन भरलेले आहेत. (सन 2011-12 ते 2016-17) अशा सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज अद्याप महाविद्यालय स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत.  प्रलंबित असलेल्या अर्जांवर योग्य ती कार्यवाही करुन अर्ज निकाली काढून गुरुवार दि.27 ते शनिवार दि. 6 ऑक्टोंबर 2018 पर्यंत संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे प्रलंबित पात्र व पूर्णपणे अर्जासह आणि बी-स्टेंटमेंट ऑनलाईन सादर न केल्यास सदर प्रलंबित अर्ज रद्द झाल्याचे समजण्यात येऊन अर्ज ऑनलाईन संगणक प्रणालीमधून काढून टाकण्यात येतील.  तसेच या विद्यार्थ्यांची प्रलंबित असलेली शिष्यवृत्ती, शिक्षण फी अदा करण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची असेल असे सहाय्यक आयुक्त  समाज कल्याण रायगड-अलिबाग रविकिरण पाटील यांनी कळविले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज