परसातील कुक्कुट पालन योजनेसाठी श्रीवर्धन, सुधागड-पाली, कर्जत व अलिबाग तालुक्यातील शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत- जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सचिन देशपांडे
रायगड (जिमाका) दि.17 :- रायगड जिल्हयामध्ये परसातील कुक्कुट पालनास प्रोत्साहन देत ही प्रक्रिया रोजगारक्षम करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करणे ही योजना 2017-18 पासून राबवण्यात येत असून श्रीवर्धन, सुधागड-पाली, कर्जत व अलिबाग या तालुक्यातून पुरेसा प्रतिसाद अद्याप पर्यंत न मिळाल्याने या योजनेसाठी नव्याने अर्ज मागवण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सचिन देशपांडे यांनी दिली आहे.
चार तालुक्यातून प्राप्त अर्जातून प्रत्येकी एका लाभार्थ्याची जिल्हा निवड समिती मार्फत निवड करण्यात येईल. या योजने अंतर्गत तपशील-जमीन-2500 चौ.फूट (1000 चौ. फुटाचे 2 शेड) खाद्य, अंडी साठवणूक व अंडी उबवणूक यंत्र ठेवण्यासाठी स्वतंत्र खोल्या. शासन/लाभार्थी सहभाग- जमीन व खोल्या लाभार्थीच्या स्वत:च्या मालकीच्या असतील, एकूण अंदाजित किंमत- निरंक.तपशील- प्रति 1000 चौ. फुटाचे 2 पक्षी गृहाचे बांधकाम, स्टोअर रूम, पाण्याची टाकी, विद्युतीकरण, शासन/लाभार्थी सहभाग- शासन + लाभार्थी, एकूण अंदाजित किंमत- रु.4,00,000/-.तपशील-खाद्य व पाण्याची भांडी, ब्रडर, इतर उपकरणे व लसीकरण, शासन/लाभार्थी सहभाग-शासन+लाभार्थी, एकूण अंदाजित किंमत-रु. 50,000/-. तपशील- अंडी उबवणूक यंत्र (Mini Setter cum Hatcher), शासन/लाभार्थी सहभाग-शासन+लाभार्थी, एकूण अंदाजित किंमत- रु.1,80,000/-.
तपशील- 1000 एक दिवसीय मिश्र (नर+मादी) पिले प्रति पक्षी रु.60/-, शासन/लाभार्थी सहभाग-शासन+लाभार्थी, एकूण अंदाजित किंमत- रु. 60,000/-. तपशील- 20 आठवड्यांची अंड्यावरील 500 पक्षी (नर+मादी) प्रति पक्षी 150/-, शासन/लाभार्थी सहभाग-शासन+लाभार्थी, एकूण अंदाजित किंमत-रु.75,000/-. तपशील-1000 एकदिवसीय पिलांसाठी 20 आठवडे कालावधी पर्यंत पक्षी खाद्य पुरवठा (प्रति पक्षी एकूण 8.50 कि.ग्रॅम खाद्य प्रति किलो रु.25/- दराने) , शासन/लाभार्थी सहभाग-शासन+लाभार्थी, एकूण अंदाजित किंमत- रु.1,12,500/-. तपशील- एग नेस्ट्स, शासन/लाभार्थी सहभाग-शासन+लाभार्थी, एकूण अंदाजित किंमत- रु.30,000/-. तपशील- पक्षी खाद्य ग्राईंडर (सिंगलफेज), शासन/लाभार्थी सहभाग-शासन+लाभार्थी, एकूण अंदाजित किंमत- रु.16,000/-, अशी एकूण अंदाजित रक्कम रु.10 लाख 27 हजार 500.
याप्रमाणे एकूण रक्कम रु.10 लाख 27 हजार 500 पैकी सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना ५०% अनुदान म्हणजेच रु. 5 लाख 13 हजार शासनाचे अनुदान देय राहील. लाभार्थी निवड ही सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपाय योजना व जनजाती क्षेत्र उपाय योजनेतील जे लाभार्थी सद्य:स्थितीत कुक्कुट पालन व्यवसाय करत आहेत, तसेच ज्या लाभार्थ्यांकडे अंडी उबवणुकीचे यंत्र आहे अशा लाभार्थीना प्राधान्य राहील. निवड केलेल्या लाभार्थीना हा प्रकल्प 3 वर्ष कार्यान्वित ठेवणे बंधनकारक राहील. निवड केलेल्या लाभार्थ्यांना 5दिवसांचे कुक्कुट पालन विषयक प्रशिक्षण व खाजगी अंडी उबवणूक केंद्र, शासकीय अंडी उबवणूक केंद्र, लघु अंडी उबवणूक यंत्राचा वापर करीत असलेल्या प्रक्षेत्रावर भेटीचा समावेश आहे. लाभार्थी निवड ही जिल्ह्याच्या पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली शासन निर्णया प्रमाणे सात सदस्यांच्या गठीत समिती पुढे निवड केली जाणार आहे.
या योजनेंतर्गत पशुसंवर्धन विभागाने परिपत्रित केलेल्या अर्जाचा नमूना तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी विस्तार यांच्याकडे उपलब्ध राहील. या योजनेंतर्गत निवडलेल्या लाभार्थींकडे 2500 चौ. फुट जागा स्वत:च्या मालकीची असावी. त्या ठिकाणी दळणवळण, इलेक्ट्रिसीटी, पाण्याची सोय उपलब्ध असावी. या योजनेचे अनुदान एकदाच देय असून प्रकल्प कार्यान्वित ठेवणेसाठीचा पुढील खर्च संपूर्णपणे लाभार्थीने करावयाचा आहे. या योजनेंतर्गत 1000 चौ. फुट पक्षीगृहाचे बांधकाम खात्याने ठरवून दिलेल्या मोजमापाप्रमाणे असणे आवश्यक आहे. लाभार्थीने लघु अंडी उबवणूक यंत्राची खरेदी करताना किमान 1000 अंडी उबविण्याची क्षमता व किमान 14 के व्ही. ए. क्षमतेचा डिझेल अथवा गॅसवर चालणारे जनरेटर यंत्र असावे. यंत्राची उभारणी व कनेक्शन व दोन वर्षाची वॉरंटी, अंडी उबवणूक यंत्र उत्पादकाकडून लाभार्थीस प्रशिक्षण दिलेले असावे. प्रकल्प उभारणी नंतर योजनेमध्ये समाविष्ट तपशीलाची पडताळणी नेमून दिलेल्या अधिकार्या मार्फत करण्यात येईल. निवड झालेल्या लाभार्थीने मान्यताप्राप्त एक दिवशीय मिश्र पिल्ले, 20 आठवडे वयावरील अंड्यांवरील पक्षी, उबवणुकीचा अंडी, यांची खरेदी सघन कुक्कुट विकास गट/ मध्यवर्ती व इतर शासकीय निमशासकीय संस्था कडून जिल्हा स्तरीय निवड समितीच्या शिफारशीने खरेदी करणे बंधनकारक राहील. खरेदीच्या पावत्या, डिलेव्हरी चलन यांची पडताळणी केल्यानंतरच अनुदान थेट लाभार्थींच्या बँक खात्या मध्ये जमा करण्यात येईल. सुरूवातीस आवश्यक लघु अंडी उबवणूक केंद्रास लागणारी अंडी शासकीय संस्थेकडून खरेदी करणे बंधनकारक राहील. तदनंतर लाभार्थीने स्वत:च्या प्रक्षेत्रावर उत्पादित उबवणुकीच्या अंड्यांचा वापर करून पिल्ले निर्मिती करणे आहे.
अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांनी दि.13 नोव्हेंबर, 2017 चा शासन निर्णय व दि.23 नोव्हेंबर, 2017 मार्गदर्शक सूचनानुसार अभ्यासपूर्वक बाबी अभ्यासूनच अर्ज करावा, जेणे करून अर्जदाराचा नाहक खर्च होणार नाही. सूचना व योजनेच्या अंमलबजावणी बाबत तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा.
0000000
Comments
Post a Comment