सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा-2017 पारितोषिक वितरण

अलिबाग, जि. रायगड, दि.28 (जिमाका)-  आपण सारे घरात बसून कुटूंबियांसोबत सण साजरे करत असतांना आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांचा त्याग साऱ्या समाजाने समजावून घेतला पाहिजे. समाजाने स्वतःहूनच अनेक बाबतीत शिस्त पाळली, नियमांचे पालन केले तर अनेक गोष्टींच्या त्रासापासून आपण आणि पोलीस यंत्रणाही मुक्त होईल. म्हणून स्वयंशिस्त ही समाजहिताची आहे, असा हितोपदेश ज्येष्ठनिरुपणकार डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आज येथे केला.
रायगड जिल्हा पोलिसदलातर्फे आयोजित सार्वजनिक गणेशोस्तव स्पर्धा 2017 चा पारितोषिक वितरण सोहळा आज डॉ. धर्माधिकारी यांच्या हस्ते येथील पीएनपी नाट्यगृहात पार पडला. यासोहळ्यास जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक,  बॅंक ऑफ इंडियाचे विमल राजपूत, ज्येष्ठ पत्रकार विनायक पात्रुडकर, तसेच प्रकाश धर्माधिकारी, सचिन धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्रीगणेशाची व श्री देवीची नृत्यवंदना  सादर केली.
 त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते  सहभागी गणेशोत्सव मंडळांना पारितोषिक वितरण करण्यात आले. तसेच गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या प्रवासाला निविघ्नपणे पार पाडणाऱ्या वाहतुक पोलिसांचा सत्कार करण्यात आला.
 यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी  सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले. स्वच्छतेचे उपक्रम,  विद्यार्थी, खेळाडू दत्तक योजना, एखादे गाव विकासासाठी दत्तक घेणे आदी उपकम मंडळांनी राबवावे असे आवाहन डॉ. सूर्यवंशी यांनी केले. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर यांनीही आपले  मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक पत्रकार जयंत धुळप यांनी केले तर आभार प्रदर्शन पोलीस उपअधिक्षक राजेंद्र दंडाळे यांनी केले.  या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व बॅंक ऑफ इंडिया यांनी  सहकार्य केले होते.
यावेळी सन्मानित करण्यात आलेली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची नावे-

प्रथम क्रमांक आदर्श मित्रमंडळ,अलिबाग., द्वितीय-संत रोहीदासनगर, सार्व, गणपती मंडळ महाड., तृतिय-बालमित्र मंडळ,वरची खोपोली., विशेष उल्लेखनिय सार्वजनिक गणेशोत्सव, भाटे वाचनालय, रोहा.,  श्री भैरवनाथ मित्रमंडळ परळी-पाली., आदर्श ममता नगर, रहिवासी मंडळ माणगांव.,  उपजिल्हा रुग्णालय,श्रीवर्धन.,  कालकाई माता क्रीडा व सामाजिक संस्था सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कोतवाल बु.,  न्युस्टार गणेशोत्सव मंडळ, तरेआळी, पेण., सार्वजनिक गणेश मंडळ,कर्जत बाजारपेठ., नवतरुण मित्रमंडळ, खानाव.

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज