रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक




अलिबाग दि.21, शासन ग्रामविकास विभाग यांच्याकडील अधिसूचना क्र.जिपनि 2018/प्र.क्र.215/पंरा-2, दि.04/12/2019 महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांच्याकडील पत्र क्र.जिपंनि-2019/प्र.क्र.4 अ/पंरा-2 दि. 10 डिसेंबर 2019 अन्वये रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीसाठी बैठक दि.03/01/2020 रोजी होणार आहे.
त्या अनुषंगाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 व त्याखालील नियमातील तरतूदीनुसार रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीसाठी जिल्हा सर्व सदस्यांची बैठक दि.03/01/2020 रोजी दुपारी 2.00 वाजता कै.ना.ना.पाटील, सभागृह रायगड जिल्हा परिषद अलिबाग येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर निवडणूकीचा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.
1.) अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करणे-दि.03/01/2020 रोजी सकाळी 11.00 ते 1.00 वाजे पर्यंत कै.प्रभाकर पाटील सभागृह रायगड जिल्हा परिषद अलिबाग येथे. 2.) अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी बैठक-दि.03/01/2020 रोजी दुपारी 2.00 वाजता. 3.) पिठासीन अधिकारी यांच्या मार्फत दाखल नामनिर्देशन पत्रांची छाननी करणे- दि.03/01/2020 रोजी दुपारी 2.00 वाजता बैठक सुरु झाल्यानंतर.  4.) वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची नांवे त्यांच्या सूचकासह वाचून दाखविणे-नामनिर्देशन पत्रांची छाननी पूर्ण झाल्यानंतर. 5.) उमेदवारी मागे घेणे- अ.क्र.4 चे कामकाज पूर्ण झाल्यानंतर. 6.) आवश्यक असल्यास अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेणे-अ.क्र.5 चे कामकाज पूर्ण झाल्यानंतर. 7.) आवश्यकता असल्यास  उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेणे-अ.क्र.6चे कामकाज पूर्ण झाल्यानंतर.
सबब रायगड जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी दि.03/01/2020 रोजी कै.ना.ना.पाटील सभागृह,  रायगड जिल्हा परिषद अलिबाग येथे उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज