पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडणूक



अलिबाग दि.21, महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाकडील अधिसूचना क्र.पंसनि 2018/प्र.क्र.218(1)/ पंरा-2 दि.27/11/2019 रोजीच्या अधिसूचने अन्वये व ग्रामविकास विभागाकडील पत्र दि.10 डिसेंबर 2019 अन्वये दिलेल्या निर्देशांचे अनुषंगाने पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडणूकीसाठी बैठक सोमवार दि.30/12/2019 रोजी होणार आहे.
            त्या अनुषंगाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 व त्या खालील नियमातील तरतूदीनुसार जिल्ह्यातील एकूण 15 पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती  पदाच्या निवडणूकीसाठी पंचायत समितीच्या सर्व सदस्यांची बैठक दि. 30/12/2019 रोजी दुपारी 2.00 वाजता संबंधित पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. सदर निवडणूकीचा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.
            1.) सभापती व उपसभापती पदासाठी नामनिर्दशनपत्र दाखल करणे-दिनांक 30/12/2019 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत पंचायत समिती सभागृहामध्ये. 2.) सभापती व उपसभापती पदाच्या निवडीसाठी बैठक-दि.30/12/2019 रोजी दुपारी 2.00 वाजता. 3.) प्राधिकृत अधिकारी यांचे मार्फत दाखल नामनिर्देशन पत्रांची छाननी करणे-दिनांक 30/12/2019 रोजी दुपारी 2.00 वाजता बैठक सुरु झाल्यानंतर. 4.) वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची नांवे त्यांच्या सूचकासह वाचून दाखविणे-नामनिर्देशन पत्रांची छाननी पूर्ण झाल्यानंतर 5.) उमेदवारी मागे घेणे-अ.क्र.4 चे कामकाज पूर्ण झाल्यानंतर. 6.) आवश्यकता असल्यास सभापती पदासाठी निवडणूक घेणे-अ.क्र.5चे कामकाज पूर्ण झाल्यानंतर. 7.) आवश्यकता असल्यास उपसभापती पदासाठी निवडणूक घेणे-अ.क्र.6चे कामकाज पूर्ण झाल्यानंतर.
            सबब रायगड जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या सदस्यांनी दि.30/12/2019 रोजी वरील प्रमाणे बोलाविण्यात आलेल्या विशेष सभेच्या ठिकाणी उपस्थित रहावे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक