कोळंबी बीज उत्पादन केंद्र योजनेचा लाभ घेण्याकरीता संपर्क साधावा
अलिबाग, जि. रायगड, दि.21 (जिमाका)-
महाराष्ट्र राज्यामध्ये कोकण विभागातील सात जिल्हयामध्ये दोन मोठे कोळंबी बीज उत्पादन केंद्र वाषिर्क 200.00 दशलक्ष पोस्ट लार्व्हा क्षमता असलेले (ठाणे-पालघर व रायगड जिल्हयाकरीता एक व रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्हयासाठी एक) व भांडवली खर्च रू. 460.00 लक्ष प्रती कोळंबी बीज उत्पादन केंद्र किमतीच्या व 25
टक्के अनूदानासहीत तसेच पाच छोटे कोळंबी बीज उत्पादन केंद्र, 50.00 लक्ष पोस्ट लार्व्हा क्षमता असलेले (ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्हयासाठी प्रती जिल्हा एक) भांडवली खर्च रू. 50.00 लक्ष प्रती कोळंबी बीज उत्पादन केंद्र किमतीच्या व 50
टक्के अनुदानासह खाजगी व्यक्ती, संस्था व कंपनी यांना वर नमूद केलेल्या अनुदानासह देण्याबाबत शासनाने कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभाग, शासन निर्णय क्रमांक मत्स्यवि 2017/प्र.क्र.76/पदुम-12,
दि. 28 मार्च 2018 रोजी निर्गमित केला आहे.
सदर योजनेचा लाभ घेण्याकरीता जिहयातील इच्छुक व्यक्ती, संस्था व कंपनी यांना यांचे स्वयंस्पष्ट प्रस्ताव डी.पी.आर. सह कार्यालयीन वेळेत सादर करावेत, प्रकल्पाकरीता आवश्यक अटी व शर्ती व इतर आवश्यक माहिती वर नमुद केलेल्या शासन निर्णयाप्रमाणे राहिल.
अधिक माहितीसाठी प्र
सहाय्यक आयूक्त मत्स्यव्यवसाय, रायगड-अलिबाग
र. प्र. राजम, श्री सिद्धी अपार्टमेंट, तिसरा मजला, डॉ. पुष्पलता शिंदे हॉस्पिटलच्या समोर, अलिबाग पेण रोड. (दूरध्वनी क्रमांक- 02141-224221) यांच्याशी संपर्क साधावा.
00000
Comments
Post a Comment