पणन हंगाम 2019-20 मधील वाढीव भात खरेदी केंद्र
अलिबाग दि.19, आधारभूत किंमत भात खरेदी योजने अंतर्गत मार्केटींग
फेडरेशन मुंबई यांनी नियुक्त केलेल्या अभिकर्ता संस्था जिल्हा मार्केटींग रायगड यांच्यामार्फत
खरीप व रब्बी पणन हंगाम 2019-20 मध्ये रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील मंजूर
अनिकेत राईस मिल झाप या धानखरेदी केंद्रावर खरेदी सुरु करण्यांत येणार आहेत.
सदरचा
भात खरेदीचा कालावधी हा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्याकडील शासन
निर्णय क्र.खरेदी-1019/प्र.क्र.98/ना.पु.29 दि.29 सप्टेंबर 2019 अन्वये खालील प्रमाणे
विहित केला आहे.
खरीप पणन हंगाम दि.1 ऑक्टोंबर
2019 ते दि. 31 मार्च 2020
रब्बी पणन हंगाम दि.1 मे 2020 ते
दि. 30 जून 2020
भात
खरेदीच्या वेळी शेतकऱ्यांनी आपल्याकडील जमिनीबाबतचा 7/12 चा उताऱ्याची व गाव नमूना
8(अ) ची छायाप्रत खरेदी केंद्रावर धानविक्री करीता आणणे आवश्यक आहे. सदरहू उताऱ्यातील
धान्य व धानाखालील क्षेत्र पाहून धान/भरडधान्य खरेदी करण्यात येईल. शेतकऱ्यांचे
7/12 उतारानुसार पीकाखालील क्षेत्र या वर्षीची पीक परिस्थिती (पैसेवारी) पीकाचे सरासरी
उत्पादन या बाबी विचारात घेऊन धान/धरडधान्य खरेदी करण्यात येईल.
सदर
धानाची खरेदी ही ऑनलाईन पध्दतीने होणार असल्याने संबंधित शेतकऱ्यांची नोंदणी करणे आवश्यक
राहील. याकरीता खरेदी केंद्रावर भात विक्री करीता आणताना प्रत्येक शेतकऱ्यांनी सोबत
आपल्या आधारकार्डाची तसेच बँकेच्या पासबुकाची छायाप्रत आणणे आवश्यक आहे. रोज सायंकाळी
खरेदी केंद्र बंद झाल्यानंतर खरेदी केंद्रावर आणलेले परंतू खरेदी न झालेले धान/भरडधान्य
सांभाळण्याची जबाबदारी संबंधित शेतकऱ्यांचीच राहील.
धानाच्या
आधारभूत किंमती
भात
सर्वसाधारण- रुपये 1815/- प्रती क्विंटल, शेतकऱ्यांना अदा करण्याची रक्कम रु.1815/-
प्रती क्विंटल. भात अ ग्रेड रुपये 1835/- प्रती क्विंटल, शेतकऱ्यांना अदा करण्याची
रक्कम रु.1835/- प्रती क्विंटल.
आधारभूत
किंमत खरेदी योजने अंतर्गत केंद्र शासनाने विहित केलेल्या विनिर्देशात बसणारे FAQ दर्ज्याचेच
धान/भरडधान्य खरेदी करण्यात येईल. केंद्र शासनाने हंगाम 2019-20 करीता आर्द्रतेचे अधिकतम
प्रमाण धानासाठी 17 टक्के विहित केले आहे. या प्रमाणापेक्षा आर्द्रता जास्त् आढळल्यास
भाताची खरेदी करण्यांत येणार नाही. भात खरेदी करताना ओलावा व आर्द्रतेचे प्रमाण 71
टक्के असल्याची खात्री करुनच धान/भरडधान्यची खरेदी करण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत
जास्त ओलसर किंवा बुरशीयुक्त धान/भरडधान्य खरेदी करुन नये. विहित प्रमाणापेक्षा जास्त
आर्द्रता असलेले धान/भरडधान्य खरेदी केल्यास अभिकर्ता संस्थांनी वेळीच संबंधितांवर
दंडात्मक कारवाई करावी.
भरडधान्य
स्वच्छ व कोरडे असून ते व्रिकी योग्य (मार्केटेबल) असल्याची अभिकर्त्यांनी खातर जमा
केल्यावरच भाताची खरेदी करण्यांत येईल. मात्र भात आर्द्रतेच्या विहित प्रमाणात असल्याची
खात्री करुन ते स्विकारल्यानंतर आर्द्रता कटाती लावण्यांत येणार नाही. धान खरेदी करताना
धान स्वच्छ कोरडे असावे. खरेदी केंद्रावर फक्त खरेदी किंमती बद्दल दरफलक न लावता आधारभूत
किंमत खरेदी योजने अंतर्गत असलेले धानाचा दर्जा, विनिर्देश, खरेदी केंद्रे तसेच एफ.ए.क्यु.
दर्जाची मानके इत्यादी बाबतची माहिती मराठीतूनच फलकावर दर्शविण्यांत यावीत. तसेच खरेदी
केंद्र व त्यास जोडण्यांत आलेल्या गावांची नावे याची प्रसिध्दी प्रत्येक धान खरेदी
केंद्रावर अभिकर्ता संस्थांनी देण्यात यावी.
आधारभूत
किंमत खरेदी योजने अंतर्गत शासनाने निर्धारित केलेल्या धानाच्या किमती, दर्जा, खरेदी
केंद्र व खरेदी केंद्रास जोडण्यात आलेली गावे दर्शविणारे फलक सर्व कृषी उत्पन्न बाजार
समिती ग्रामपंचायत, तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय इत्यादी ठिकाणी दर्शनी भागावर
प्रसिध्दी करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. केवळ शेतकऱ्यांकडून उत्पादीत झालेले नवे धान/भरडधान्याची
खरेदी करण्यात येईल. खरेदी केलेल्या धान/ भरडधान्याची देय रक्कम शेतकऱ्यांना अदा करताना
ऑनलाईन पध्दतीने प्रदान करणे बाबत शासनाचे निर्देश आहेत. अभिकर्ता संस्थांच्या मुख्यालयातून
थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरेदी केलेल्या धानाची रक्कम अदा करण्यात येईल. सदरची
रक्कम कोणत्याही परिस्थितीत धान/भरडधान्य खरेदी केलेल्या दिवसापासून पुढील 7 दिवसापर्यंत
शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली पाहिजे अशा शासनाच्या सूचना आहेत.
भात
खरेदी केंद्राची ठिकाणे व त्यास जोडलेली गावे यांची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी
रायगड अलिबाग, संबंधित तहसिलदार / गट विकास अधिकारी पंचायत समिती तसेच उप अभिकर्ता
म्हणून काम करणाऱ्या सह.संस्था / खरेदी विक्री संघ/ सह.भात गिरणी यांच्याकडे उपलब्ध
राहील.
जिल्हा
मार्केटिंग अधिकारी रायगड यांच्याकडील मंजूर वाढीव धान खरेदी केंद्र तालुका-सुधागड,
सबएजंट संस्थेचे नांव- अनिकेत राईस मिल झाप, खरेदी केंद्र-झाप, धान खरेदीचा कालावधी-
खरीप हंगाम 1 ऑक्टोंबर 2019 ते 31 मार्च 2020 रब्बी हंगाम 1 मे, 2020 ते 30 जून
2020
00000
Comments
Post a Comment