राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी यांचे अभिवादन





रायगड-अलिबाग दि.02:-  राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी  सहपत्नीक महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. 
स्वच्छता ही सेवा
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्ताने ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम जिल्ह्यात राबविला जात आहे.  या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात  प्लास्टिक वस्तूचा त्याग करुन पर्यावरणाच्या रक्षणात जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी श्रमदान केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्यश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, उपजिल्हाधिकारी (रोहयो)  रविंद्र मठपती तसेच अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत