दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, महाड या न्यायालयाचे उद्या होणार उद्घाटन


 

रायगड (जिमाका) दि.25:- दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर, महाड या न्यायालयाचा उद्घाटन समारंभ शनिवार दि.26 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वाजता मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती, जिल्हा रायगड  रियाज इ.छागला यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी उच्च न्यायालय, मुंबई तथा पालक न्यायमूर्ती, जिल्हा रायगड मिलिंद म.साठये आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग अजेय श्री. राजंदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

भूसंपादन प्रकरणे, हिंदू विवाह कायद्यांतर्गत दाखल होणारी प्रकरणे, सरकार विरुध्दची प्रकरणे, रक्कम रुपये पाच लाखावरील दावे व इतर प्रकरणांसाठी महाड व पोलादपूर या महसुली तालुक्यांकरीता पक्षकार व वकीलांना प्रकरणे दाखल करण्यासाठी अलिबाग येथे यावे लागत होते. त्यामुळे पक्षकारांना आर्थिक भुर्दंड पडत होता.  तसेच त्यांचा वेळही वाया जात होता. त्यामुळे या परीसरातील पक्षकार व वकीलांची महाड येथे दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर हे न्यायालय सुरु करण्याची मागणी गेल्या काही वर्षापासून प्रलंबित होती.

महाड व पोलादपूर या महसुली तालुक्यांकरीता महाड, जिल्हा रायगड येथे दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, महाड यांचे न्यायालय स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव मा.उच्च न्यायालयास सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास मा.उच्च न्यायालयाने मंजुरी दिली असून त्याबाबतची अधिसूचना विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडून निर्गमित करण्यात आली आहे. या नूतन न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पी.एम.उन्हाळे यांची मा.उच्च न्यायालयाकडून नियुक्ती करण्यात आली आहे.  महाड येथे दि. 26 ऑगस्ट पासून दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर यांच्या न्यायालयाचे कामकाज सुरु होणार आहे, असे जिल्हा न्यायालय, रायगड-  अलिबाग यांच्याकडून कळविण्यात आले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन