र.वा.दिघे स्मृती पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.11- कोकणातील साहित्यिक कै. र.वा.दिघे यांच्या नावाने कोकणातील साहित्यिकांसाठी गेल्या 10 वर्षापासून पुरस्कार देण्यात येत आहे. रुपये पाच हजार तसेच स्मृतीचिन्ह् असे पुरस्काराचे स्वरुप असून गुरुवार दि.19 जुलै रोजी पत्रकार संघाच्या वर्धापनदिनी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 1 मे 2017 ते 15 जून 2018 या कालावधीत ज्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. अशा लेखकांनी सोमवार दि.25 जून 2018 पर्यंत आपली पुस्तके दोन प्रतीत अध्यक्ष, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघ, रामनारायण पत्रकार भवन, ता.अलिबाग जि.रायगड या पत्त्यावर पाठवावेत,असे आवाहन अध्यक्ष, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघ यांनी केले आहे.संपर्कासाठी फोन नं.9370690626,9767341291 असा आहे.

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज