रायगड जिल्हा निवडणूक प्रशासनाने केली रुग्ण मतदारांसाठी खास रुग्णवाहिकेची सोय
रायगड अलिबाग
दि.21, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक
अधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी अलिबाग येथील सिव्हील हॉस्पीटल मधील रुग्णांना अलिबाग
पासून दहा ते वीस कि.मी.च्या परिसरातील मतदान केंद्रावर रुग्णवाहिकेद्वारे पोहचवून
मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ज्या रुग्णांना रुग्णवाहिकेद्वारे मतदान
करण्यासाठी जावयाचे आहे. त्यांच्यासाठी चार रुग्णवाहिकेची सुविधा सिव्हील हॉस्पीटल
व नगरपालिकेच्यावतीने करण्यात आलेली आहे. आता पर्यंत आठ रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी
या सुविधेचा लाभ घेतला आहे.
00000

Comments
Post a Comment