ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचे अर्ज स्विकारण्यास दि.26 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ
रायगड-अलिबाग,दि.30(जिमाका):- सन 2025-26 या वर्षापासून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना https://hmas.mahait.org, या पोर्टलवर ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेकरीता पात्र विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org, या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरुन आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, रायगड, कच्छिभवन, नमिनाथ जैन मंदिरा जवळ, श्रीबाग रोड, अलिबाग येथे सादर करावेत असे आवाहन सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, रायगड सुनिल जाधव यांनी केले आहे.
राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकाची मुदत दि.19 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2025 देण्यात आली होती. वसतिगृहामध्ये प्रवेशासाठी अर्ज करावयाच्या कालावधीमध्ये वाढ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी झाल्याने या प्रवेश प्रक्रियेसाठी खालील विवरणपत्राप्रमाणे मुदतवाढ देण्यात आली आहे.
अर्ज सादर करण्याकरीताचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :- 12 वी नंतरच्या दिनांक व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम (बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून), प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी दि.30 सप्टेंबर ते 26 ऑक्टोबर 2025, अर्ज छाननी करावयाचा कालावधी- दि.27 ऑक्टोबर ते दि.04 नोव्हेंबर 2025, पहिली निवड यादी गुणवत्तेनुसार प्रवेशाची अंतिम मुदत- दि.20 नोव्हेंबर 2025.
000000
Comments
Post a Comment