निवडक टॉप क्लास शाळांमध्ये शिकण्यासाठी लागणारा शैक्षणिक खर्च मिळणार शासकीय योजनेतून

 

 

रायगड-अलिबाग,दि.01(जिमाका):- केंद्र शासनाच्या Top Class Education in School for OBC,EBC & DNT Students"under PM YASASVI- reg EG. या योजनेकरिता ईबीसी ,डीएनटी प्रवार्गार्तील इयत्ता वी ते 12 वी र्गात शिकणाऱ्या विद्यार्थांनी https://scholarships.gov.in/ या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंत उच्च दर्जाचे शिक्षण मिळावेयासाठी निवडक टॉप क्लास शाळांमध्ये शिकण्यासाठी लागणारा शैक्षणिक खर्च शासकीय योजनेतून मिळणार असल्याची माहिती सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, रायगड सुनिल जाधव यांनी दिली आहे.

          याकरिता पात्रता  पुढीलप्रमाणे :-लाभार्थी: ओबीसीईबीसीडीएनट्टी   प्रवर्गातील विद्यार्थी, वार्षिक कुटुंबीय उत्पन्नः कमाल 2 लाख  50 हजार असावे, निवड पद्धतः मागील वर्गातील गुणांच्या आधारे मेरिट यादी, आरक्षण: किमान 30% जागा मुलींसाठी राखीव, शाळा निवडः सलग वर्षांमध्ये 100 % निकाल देणाऱ्या रायगडजिल्ह्यातील सर्वोत्तम शाळांचीनिवडकेलीली यादी  मिळविण्यासाठी   सोबतचा QR code स्कॅन करून घेणे.

 

 

वर्गनिहाय  आर्थिक मदत इयत्ता वी-10 वी, वार्षिक मदत 75,000, समाविष्ट घटक शुल्कवसतिगृह शुल्कपरीक्षा फी, पुस्तकेगणवेश, विशेष बाबी वी वीच्या गुणांवर आधारितमेरिट यादी.

इयत्ता 11 वी-12 वी, वार्षिक मदत 1,25000, समाविष्ट घटक शुल्क,वसतिगृह शुल्कप्रयोगशाळाशुल्ककोचिंग फी, पुस्तकेगणवेश, विशेष बाबी 10 वी/ 11 वीच्या वीच्या गुणांवर आधारितमेरिट यादी

अर्ज प्रक्रिया :- राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे, शाळा नोडल अधिकारी ऑनलाईन पडताळणी करेल,राज्य सरकारकडून अंतिम मंजूरी, मुलगे व मुलींसाठी स्वतंत्र मेरिट यादी तयार, शिष्यवृत्तीची रक्कम डीबीटी (Direct Benefit Transfer) द्वारे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार.

अटी व निरीक्षण :- आधार लिंक केलेली उपस्थिती प्रणाली आवश्यक,नियमित उपस्थिती व समाधानकारक शैक्षणिक प्रगती आवश्यक,. इतर शासकीय योजनेंतर्गत एकाच उद्देशासाठी दुहेरी लाभ घेता येणार नाही

अर्ज भरण्याची मुदत :- दि.15 ऑक्टोबर 2025.

हे  अर्ज https://scholarships.gov.in/ या पोर्टलवर ऑनलाईन भरणे  व शाळा नोडल अधिकारी ऑनलाईन पडताळणी करणे.

 

००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत