पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा

 

अलिबाग,जि.रायगड,दि.11 (जिमाका):- राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा  जिल्हा दौरा खालीलप्रमाणे-

  शुक्रवार दि.12 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10.00 वा. सुतारवाडी ता.रोहा येथून शासकीय वाहनाने ता.म्हसळाकडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. पाष्टी, ता.म्हसळा येथे आगमन व तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपुजन व उद्घाटन कार्यक्रम :- पाष्टी रस्त्याचे भूमिपुजन कार्यक्रम, पाष्टी बौध्दवाडी सभामंडप भूमिपुजन कार्यक्रम, मांदाटणे साठवण तलाव उद्घाटन कार्यक्रम, रा.मा.99  ते कुडगाव जोडमार्ग भूमिपुजन कार्यक्रम.   दुपारी 1.30 वा. श्री.दाजी विचारे यांच्या निवासस्थानी, मु.फळसप, ता.म्हसळा येथे राखीव. दुपारी 2.00 वा. फळसप येथे साकव बांधकामाचे भूमिपुजन कार्यक्रम, संदेरी बौध्दवाडी रस्त्याचे भूमिपुजन कार्यक्रम, संदेरी येथील साकव बांधकामाचे भूमिपुजन कार्यक्रम, आंबेत वलजारवाडी रस्त्याचे भूमिपुजन कार्यक्रम, मुख्य रस्ता ते आंबेत रस्त्याचे भूमिपुजन कार्यक्रम, आंबेत बौध्दवाडी ते मोहल्याकडे जाणाऱ्या जोडरस्ता भूमिपुजन कार्यक्रम, प्राथमिक आरोग्य केंद्र, आंबेत नवीन इमारतीची पाहणी.

सायंकाळी 4.00 वा. म्हसळा येथून शासकीय वाहनाने ता.माणगावकडे प्रयाण. सायं.4.45 वा. फिरदोस राऊत यांच्या पारंपारिक भारतीय हातमागाच्या वस्तूंचे दालनास 3 वर्षेपूर्ती निमित्त सदिच्छा भेट. स्थळ : शॉप नं.4, रॉयल प्लाझा, स्टेट बँकेसमोर, मोर्बा रोड, माणगाव. सायं.5.00 वा मांगवली ता.माणगाव येथील सामाजिक सभागृह बांधकामाचे भूमिपुजन कार्यक्रम. सायं.5.15 वा.माणगाव येथून शासकीय वाहनाने ता.रोहाकडे प्रयाण. सायं.6.00 वा. रोहा शासकीय विश्रामगृह येथे आगमन व रोहा औद्योगिक क्षेत्रातील विविध प्रश्नांबाबत आढावा बैठकीस उपस्थिती. बैठकीनंतर रोहा येथून शासकीय वाहनाने सुतारवाडीकडे प्रयाण. सुतारवाडी ता.रोहा येथे आगमन व राखीव.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक