खालापूर नगरपंचायतीच्या नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि नागरीकांचा मागास प्रवर्गातील महिला व सर्वसाधारण महिला आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.11 (जिमाका):- मा राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील दि.29 ऑक्टोबर 2020 च्या आदेशान्वये खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा व पोलादपूर या नगरपंचायतीची आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. या आदेशान्वये  वरील नगरपंचायतीची आरक्षण सोडतीची कार्यवाही पूर्ण होऊन अंतिम प्रभाग रचना व आरक्षण यापूर्वीच दि.09 मार्च 2021 रोजी शासन राजपत्रात यापूर्वीच प्रसिध्द करण्यात आलेले आहे.

मा.राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील दि.09 नोव्हेंबर 2021 च्या आदेशान्वये माहे एप्रिल 2020  ते मे 2021 या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या एकूण 86 नगरपंचायतीमधील सदस्य पदांच्या ना.मा.प्र. आरक्षणाच्या सोडतीकरिता सुधारीत आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. या आदेशामध्ये नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या (ना.मा.प्र.) आरक्षणाची सोडत काढणे (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला) आरक्षण सोडतीची कार्यवाही संबंधित मुख्याधिकाऱ्यांनी शुक्रवार दि.12 नोव्हेंबर 2021 रोजी करण्याबाबत आदेशित केलेले आहे.

मा.राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील दि.09 नोव्हेंबर 2021 च्या सूचनानुसार रायगड जिल्ह्यातील उपरोक्त नगरपंचायतीपैकी खालापूर नगरपंचायतीमध्ये एकूण आरक्षण नगरपंचायतीमधील एकूण जागांच्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक होत असल्याने खालापूर नगरपंचायतीकरीता (परिशिष्ट 1 मधील अ) प्रारूप प्रभाग रचना आरक्षणसह टप्पा क्र 1 अन्वये (बुधवार दि. 10 नोव्हेंबर 2021) रोजी ना.मा.प्र. पदाच्या आरक्षणाच्या सोडतीकरिता नोटीस प्रसिध्द करणे आवश्यक होते.

मा.राज्य निवडणूक आयोगाकडील उपरोक्त आदेशान्वये  जिल्हाधिकारी, रायगड अलिबाग डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जिल्ह्यातील खालापूर नगरपंचायतीच्या नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि नागरीकांचा मागास प्रवर्गातील महिला व सर्वसाधारण महिला याकरिता आरक्षण सोडत पुढील नमूद ठिकाणी व नमुद दिनांकास आयोजित करण्यास निर्देश दिले आहेत.  त्यानुसार आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे :

नगरपंचायतीचे नांव- खालापूर, नियंत्रण अधिकाऱ्यांचे नाव व पदनाम- श्री.अमित नैराळे, उपविभागीय अधिकारी कर्जत, कार्यवाही करणाऱ्या अधिकाऱ्यांचे नाव व पदनाम- श्रीमती रश्मी चव्हाण मुख्याधिकारी, खालापूर नगरपंचायत
आरक्षण सोडतीचा दिनांक व वेळ :-शुक्रवार, दि.12 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 11.00 वा.पासून,
आरक्षण सोडतीचे ठिकाण- नेताजी पालकर सभागृह, तहसिल कार्यालय खालापूर, ता. खालापूर, जि.रायगड.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक