धरमतर खाडीमध्ये अनधिकृतपणे वाळू उपसा करणाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाची धडक कारवाई

 


अलिबाग,जि.रायगड,दि.11 (जिमाका):- अलिबाग तालुक्यातील मौजे शहाबाज येथील धरमतर खाडीमध्ये सक्शन पंपाद्वारे अनधिकृतपणे वाळू उपसा होत असल्याची खबर मिळताच जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव  यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय अधिकारी, अलिबाग श्री.प्रशांत ढगे यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग तहसिलदार श्रीमती मीनल दळवी व तहसिल कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी अनधिकृत गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर दि.7 नोव्हेंबर 2021 रोजी मध्यरात्री धडक  कारवाई केली.  या कारवाईत या पथकाने तीन बार्ज, एक सक्शन पंप आणि 35 ब्रास वाळू जप्त केली.

       यावेळी उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे यांच्यासह तहसिलदार मीनल दळवी, निवासी नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, सारळ, मंडळ अधिकारी, नागाव, मंडळ अधिकारी, पोयनाड, तलाठी, कोतवाल सहभागी होते.

०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज