उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण कार्यालयाकडून मतदान नोंदणीसाठी होणार अधिकाअधिक जनजागृती
अलिबाग,जि.रायगड,दि.11 (जिमाका):-
उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी, रायगड
अलिबाग यांच्या आदेशान्वये दि.01 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत दि. 01
जानेवारी 2022 रोजी 18 वर्ष पूर्ण होणाऱ्या मतदारांची नोंदणी करण्यात येणार आहे. या
कालावधीमध्ये अधिकाअधिक मतदान नोंदणी करण्याकामी उप प्रादेशिक परिवहन
कार्यालयाकडून योग्य ती कार्यवाही करण्याबाबत
निर्देशित करण्यात आले आहे.
त्यानुसार उप प्रादेशिक
परिवहन कार्यालय, पेण कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी
कार्यालयात कामकाजासाठी येणाऱ्या प्रत्येक
व्यक्तीकडे मतदान कार्ड आहे किंवा नाही याबाबत विचारणा करणे, नसल्यास
तात्काळ नोंदणी करून घेण्याबाबत अवगत करावे. तसेच
कार्यालयात येणाऱ्या अर्जदारांना त्यांच्या परिचयातील दि. 01 जानेवारी 2022 रोजी
पर्यंत 18 वर्ष पूर्ण होत असलेल्या व्यक्तीला मतदार यादीत नाव नोंदणी करण्यास
प्रोत्साहित करणे,
नागरिकांना मतदार नोंदणी करणेबाबत जनजागृती करणे,
मा.भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांचे eci.nic.in या संकेतस्थळावर व मा.मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य
यांचे ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध www.nvsp.in या लिंकद्वारे ऑनलाईन पध्दतीने मतदार नोंदणी करता येते याबाबत
सर्व नागरिकांना अवगत करणे.
तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण कार्यालयातील
सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात प्रत्येक कामासाठी येणाऱ्या प्रत्येक
अर्जदाराकडून मतदान ओळखपत्राची छायांकित प्रत अथवा मतदार यादीत नाव असल्याबाबतचा
पुरावा अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील, असे नागरिकांना अवगत करुन जास्तीत जास्त
मतदार नोंदणीसाठी जनजागृती करावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण महेश
देवकाते यांनी कळविले आहे.
०००००००
Comments
Post a Comment