शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी अर्ज सादर करावेत

 


 

अलिबाग,जि.रायगड दि. 10 (जिमाका):- प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण अंतर्गत सुरु असलेल्या 12 शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेशासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना सन 2021-2022 या शैक्षणिक वर्षाकरिता अर्ज सादर करावयाचे आहेत.  या प्रवेशासाठी इयत्ता आठवी, अकरावी, प्रथम वर्ष पदवी, पदविका, पदव्युत्तर, डी.टी.एड, बी.एड साठी वसतिगृहातील रिक्त जागेनुसार व गुणवत्तानिहाय प्रवेश देण्यात येईल.

तरी अनुसूचित जमातीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी https://swayam.Mahaonline.Gov.in या संकेतस्थळावर प्रवेशासाठी 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, पेण शशिकला अहिरराव यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज