खालापूर नगरपंचायतीमधील सदस्य पदांच्या (ना.मा.प्र) सुधारित आरक्षणाच्या हरकती व सूचना दाखल करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.12 (जिमाका):- मा.राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील दि.09 नोव्हेंबर 2021 च्या आदेशा मधील सूचनांनुसार दि.09 मार्च 2021 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या अंतिम प्रभाग रचनेमधील आरक्षण पाहता रायगड जिल्ह्यातील खालापूर नगरपंचायतीमध्ये आरक्षण मर्यादा ही सदस्य संख्येच्या 50 टक्क्यांच्या पुढे जात आहे. त्यामुळे खालापूर नगरपंचायतीच्या सदस्य पदाच्या (ना.मा.प्र) सुधारीत आरक्षणाची सोडतीची कार्यवाही मुख्याधिकारी, खालापूर नगरपंचायत यांच्या मार्फत दि.12 नोव्हेंबर 2021 रोजी पूर्ण करण्यात येणार आहे.

आदेशामधील परिशिष्ट 1 मधील पुढील टप्पा (ब)हरकती व सूचना तसेच सुनावणी मधील अ.क्र.1 अन्वये नगरपंचायतीतील नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला आरक्षणाची (अधिसूचना कलम 10 नुसार) रहिवाश्यांच्या माहितीसाठी व हरकती तसेच सूचना मागविण्याकरिता वृत्तपत्रात व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपरिषद नगरपंचायतीच्या वेबसाईटवर शुक्रवार दि.12 नोव्हेंबर 2021  पर्यंत प्रसिध्द करण्याबाबत आदेशित केलेले आहे.

आदेशामधील परिशिष्ट 1 मधील पुढील टप्पा (ब) हरकती व सूचना तसेच सुनावणी अ.क्र. 2 अन्वये सदस्य पदांच्या (ना.मा.प्र) सुधारीत आरक्षणाच्या हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी शुक्रवार, दि.12 नोव्हेंबर 2021 ते मंगळवार, दि.16 नोव्हेंबर 2021  पर्यंत निश्चित करून देण्यात आलेला आहे. तरी सदस्य पदांच्या (ना.मा.प्र) सुधारित आरक्षणाच्या हरकती व सूचना दाखल करण्यासाठी पुढीलप्रमाणे अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

नगरपंचायतीचे नाव- खालापूर, हरकती व सूचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव- श्रीमती रश्मी चव्हाण मुख्याधिकारी, खालापूर नगरपंचायत, दिनांक- शुक्रवार, दि.12 नोव्हेंबर 2021 ते मंगळवार, दि.16 नोव्हेंबर 2021 पर्यंत, वेळ :- सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत, हरकती व सूचना स्विकारण्याचे ठिकाण- खालापूर नंगरपंचायत, ता. खालापूर, जि.रायगड, प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी घेण्याचे ठिकाण, दिनांक व वेळ – जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग, बुधवार दि.17 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 11.00 पासून.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक