जिल्हा स्तरावरील गट-क संवर्गातील सामायिक अनुकंपा उमेदवारांची प्रतिक्षा यादी प्रसिध्द




अलिबाग, जि.रायगड, दि.07 (जिमाका) :- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या  स्तरावर ठेवण्यात येणाऱ्या एकत्रित गट-क संवर्गातील सामायिक अनुकंपा प्रतिक्षा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या उमेदवारांची प्रतिक्षा यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर, संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्या कार्यालयात व जिल्हा संकेतस्थळ www.raigad.gov.in यावर प्रसिध्द करण्यात  आलेली आहे.
या यादीतील नाव व क्रमांकाबाबत उमेदवारांची कोणतीही हरकत/आक्षेप असल्यास संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्यामार्फत आपले हरकत अर्ज दि.15 जुलै 2020 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत. दि.15 जुलै  नंतर आलेल्या हरकत अर्जांचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी कळविले आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान