निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी दि.31ऑगस्ट पर्यंत माहिती सादर करावी

 

अलिबाग,जि.रायगड,दि.18 (जिमाका):- जिल्हा कोषागार कार्यालय,रायगड-अलिबाग येथून निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारक/कुटूंबनिवृत्तीवेतनधारकांची माहिती निवृत्तीवेतन प्रणालीमध्ये अद्ययावत करावयाची आहे.    

        यासाठी जिल्ह्यातील निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतनधारक यांची माहिती मागविण्यात आली असून ती माहिती पुढीलप्रमाणे आहे---

निवृत्तीवेतनधारक/कुटूंबनिवृत्तीवेतनधारक यांचे पूर्ण नाव, निवृत्तीवेतनधारक/कुटूंबनिवृत्तीवेतनधारक यांचा पूर्ण पत्ता, निवृत्तीवेतनधारक प्रदान आदेश क्रमांक (PPO NO), बँकेचा तपशिल, बँकेचे नाव, शाखेचे नावे, निवृत्तीवेतनधारक/कुटूंबनिवृत्तीवेतनधारक यांचा बँक खाते क्रमांक, पॅनकार्ड क्रमांक (झेरॉक्स जोडण्यात यावी), निवृत्तीवेतनधारक/कुटूंबनिवृत्तीवेतनधारक यांचा भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक), निवृत्तीवेतनधारक/कुटूंबनिवृत्तीवेतनधारक यांचा ई-मेल आयडी असल्यास नमूद करण्यात यावा.

            ही माहिती जिल्हा कोषागार कार्यालयाच्या to.raigad@zillamahakosh.in या ई-मेल वर अथवा जिल्हा कोषागार अधिकारी, जिल्हा कोषागार कार्यालय, निवृत्तीवेतन शाखा, हिराकोट तलावाजवळ, रायगड-अलिबाग या पत्त्यावर दि.31 ऑगस्ट 2020 पर्यंत पाठवावी, असे जिल्हा कोषागार अधिकारी फिरोज मुल्ला यांनी कळविले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज